----------------------------------------------------------------
अमळनेर - राज्य सरकारने राज्यातील सर्व व्यवहार सुरळित केले असतांना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजिविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करून लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यात आला.भारतीय जनता पार्टी अमळनेर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली काल दि.३० ऑगस्ट रोजी विजय मारुती मंदिर येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले. यांनी घेतला सहभाग
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,
युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,युवा मोर्चा प्र. जिल्हाध्यक्ष राकेश पाटील,सरचिटणीस जिजाब पाटील,राहुल पाटील,विजय राजपूत,देवा लांडगे,महेश पाटील,दिलीप ठाकूर,अध्यात्मिक आघाडीचे महेश महाराज,प्रकाश पाटील,युवा मोर्चा ता. सरचिटणीस रवि पाटील,विलास सूर्यवंशी, राहुल चौधरी,समाधान पाटील,हिरालाल पाटील,योगीराज चव्हाण,मिलिंद पाटील,रवि ठाकूर,सौरभ पाटील,
निखिल पाटील,जयदीप पाटील,
निनाद जोशी आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

