अमळनेर नपा कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोग फरकाच्या रक्कमेचे वितरण सफाई कर्मचारी संघटनेने अधिका-यांचा केला सत्कार

Thursday, September 2, 2021

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------
                      - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------
अमळनेर - येथील नगर परिषद कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिल्या हप्त्या विषयी सर्व कर्मचारी संघटनांनी सातत्याने मागणी  लावून धरली होती. त्या नुसार पहिला हप्ता एकूण ₹ १६०२९५२४/- रुपये वितरित करण्यात आला त्यात ३६५ सफाई कामगार यांना ६४ लक्ष ४४ हजार ६५ रूपये, २०८ स्टाफ कर्मचारी यांना ४६ लक्ष ९७ हजार ४४३ रूपये, ५८७ निवृत्त कर्मचारी यांना ४८ लक्ष ८१ हजार ४२३ रूपये इतकी रक्कम माजी आमदार कृषिभूषण साहेबराव  पाटील यांच्या पुढाकाराने नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

अधिका-यांचा सत्कार
      सातव्या वेतन आयोगाच्या रक्कमेतील थकीत फरक मिळावा यासाठी कर्मचारी संघटना मागील अनेक वर्षापासून प्रयत्न करीत होत्या. या रक्कमेतील पहिला हप्ता प्रशासनातील अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याने मिळाल्यामुळे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे,
लेखा विभागातील श्री गडकर,उपमुख्याधिकारी श्री संदीप गायकवाड,आस्थापना प्रमुख नेहा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
       यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहेरे,अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल यांच्यासह अशोक लोहेरे,किशोर संगेले,यश लोहेरे,सुरेश चव्हाण,गोलू लोहेरे,नरेश कल्याणे,बलराम हटवाल,करण घटायडे,बादल लोहेरे,दर्शन लोहेरे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines