खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता उपाय योजनांसह शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करा

Thursday, September 30, 2021

/ by Amalner Headlines

मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमळनेर - अमळनेर विधानसभा मतदार संघातील सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करुन उपाय योजनांसह शेतकऱ्यांना सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
आ.पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयान्वये अमळनेर तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमान ६७०.७१ मी.मी. असून सन २०२१-२२ या खरीप हंगामातील पर्जन्यमान ५८९.०० मी.मी. पैकी सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान ६२५.६० मी.मी. एवढे सप्टेंबर अखेरीस झाले आहे.तर पारोळा तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमान ७०४.२२ मी.मी. असून सन २०२१-२२ या खरीप हंगामातील पर्जन्यमान ६१९.७६ मी.मी. पैकी सरासरी पर्जन्यमान ८६३.८० एवढे हंगामाच्या अखेरीस सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे सप्टेंबर अखेरीस अस्मानी संकटांनी उभ्या पिकांची अक्षरश: माती झाल्यामुळे पोशिंदा शेतकरी पुर्णत: उद्वस्त झाला आहे.
जून,जुलै महिन्यात कोरडा दुष्काळ तर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी यामुळे मतदारसंघातील शेतकरी हवालदील झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून अमळनेर विधानसभा मतदार संघातील सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात ओला दुष्काळ जाहिर करुन पंचनामे न करता सरसकट विना विलंब दसरा दिवाळी आधी उपाय योजनांसह जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी विनंती माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,कृषिमंत्री ना.दादा भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडवेट्टीवार तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines