अमळनेर येथे आज शिवसेनेची महत्वाची बैठक

Friday, October 1, 2021

/ by Amalner Headlines
अमळनेर - शहर व तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व शिवसेना अंगीकृत सर्व पदाधिकारी यांची महत्वाची बैठक दि.२ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता जुना टाऊन हॉल,अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.  सदर बैठकीत जि.प.,पं.स. व नगर परिषद निवडणूकी संदर्भात चर्चा विनिमय करण्यांत येणार आहे.
        या बैठकीला जिल्हाप्रमुख श्री विष्णुभाऊ भंगाळे व उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे हे उपस्थित रहाणार आहेत .तरी सर्व पदाधिका-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख विजू मास्तर, शहर प्रमुख संजय पाटील यांनी केले आहे

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines