गस्तीवरील पोलीसांच्या सतर्कतेने मोटारसायकल चोरटा गजाआड अमळनेरसह इतर ठिकाणच्या चोरीचा देखील लागला छडा

Sunday, September 12, 2021

/ by Amalner Headlines
अमळनेर - शहरातून रात्री २ वाजेच्या सुमारास धरणगावकडे जाणा-या मोटरसायकल स्वाराच्या वाहनाची गस्तीवरील पोलीसांनी  माहितीच्या आधारे  पडताळणी केली असता चोरीच्या इतरही घटनांचा तपास लागला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुस-याच दिवशी या घटनेतील आरोपीस अमळनेर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांची सतर्कता
                  दि.१० रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती आपल्या वाहन क्र. एम.एच.१९ सी.ए.१३५१ ने धरणगावकडे जात असल्याचे गस्तीवरील पोलीस सुनिल हटकर व राहूल पाटील यांना आढळून आले. त्यांनी त्याची पूर्ण माहिती घेऊन दुस-या दिवशी माहितीची खातरजमा केली असता सदर वाहन दुस-या व्यक्तीच्या नावाचे असल्याचे दिसून आले. हे वाहन जळगाव येथून चोरी झाल्याचे तपासाअंती आढळून आले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील संशयित खेमचंद तुकाराम पाटील,रा.सोनवद खु.॥,ता.धरणगाव यास सदर वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
वाहन चोरीचा लागला छडा
            पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर व्यक्तीने जळगाव येथील खोटे नगर मधून स्प्लेंडर प्लस,अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधून यामाहा,खराबवाडी चाकण पुणे येथून १ अॅक्टीव्हा व १ पॅशन प्रो,लांडगे गल्ली धरणगाव येथून हिरो स्प्लेंडर,गोलाणी मार्केट जळगाव येथून एच.एफ.डिलक्स ही वाहने चोरल्याची कबुली दिली. सदर वाहन चोरीचे त्या - त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी अटकेत - तपास सुरु
      सदर चोरीप्रकरणी  विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असले तरी अमळनेर पोलीस स्टेशनला ६०१/२०२० भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल असल्याने त्या गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे.
           अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. सुनिल पाटील,पो.ना.डॉ.शरद पाटील,प्रमोद पाटील,पो.शि.राहुल पाटील,सुनिल हटकर यांच्या पथकाने सहकार्य केले असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे करीत आहेत.
.............................................................................

1 comment

kaishadages said...

Gambling apps in Mississippi: How to register, gamble - JTM Hub
The Mississippi Gaming Commission 통영 출장샵 (MSGC) 경상남도 출장안마 has approved mobile 김해 출장마사지 casinos, 하남 출장안마 internet poker sites, and online slots for 광양 출장마사지 the

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines