अमळनेर - कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शासनाने मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले आहेत. नागरीकांनी व गणेशोत्सव मंडळांनी गणेश विसर्जन करतांना कोणती काळजी घ्यावी याबद्दल तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आदेश जारी केले आहेत. या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.
काय आहेत सुचना
तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी श्री गणपती विसर्जनाच्या बाबतीत नागरिक व गणेशोत्सव मंडळ यांच्यासाठी एका आदेशाद्वारे महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.
१) सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती मूर्ती संकलन केंद्रांवर जमा करावेत.
२) बोरी नदीच्या पात्राजवळ तिन्ही पुलांवर बंदोबस्त लावण्यात आला असुन सुरक्षेच्या व कोरोना संसर्गाचे अनुषंगाने तेथुन पुढे नागरीकांना मुर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात जाण्यास मनाई केली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक व विसर्जन करण्यासाठी नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून मुर्ती संकलित करून विधीवत विसर्जनाची उपाययोजना करण्यात आली आहे.
३) कोणीही व्यक्तिगत मोटरसायकलवर किंवा खाजगी वाहनावर विसर्जनासाठी गणेश मूर्ती घेऊन जाणार नाही याची नोंद घ्यावी.
४) मुर्ती संकलन केंद्रांची नावे
१) वाडीचौक
२) पानखिडकी
३) बडगुजर मंगल कार्यालय
४) मराठा मंगल कार्यालय
५) आर.के. नगर गेट
६) ढेकू रोड फोर्ट
७) शिवाजी महाराज नाट्यगृह
८) बजरंग मंदीर-तांबेपूरा
९) वाडी संस्थान मंदिराजवळ
१०) बोरी नदीवरील तिन्ही पुल.
वरील ठिकाणी न.पा.कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून विसर्जनाच्या निर्धारित दिवशी हे कर्मचारी त्या - त्या ठिकाणी उपस्थित रहातील. त्यांच्याकडे श्री गणपती मूर्ती द्यावी असे आवाहन प्रशासनाने
सर्व गणेश भक्तांना केले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.
No comments
Post a Comment