अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी निमित्ताने अवतरले साक्षात विठ्ठल रुक्मिणी


अमळनेर- आषाढी एकादशीनिमित्त येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व भक्तीमय वातावरणात सहभाग घेतला.
आपल्या संस्कृतीची होतेय ओळख
  शेकडो वर्षापासून विविध जाती धर्मातील लोकांना वारकरी नावाच्या एका माळेत गुंफून विविध संतांच्या प्रबोधनाने, साहित्याने पावन झालेल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री विठ्ठलास अभिवादन करण्यासाठी व आजच्या पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि संतांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आषाढी एकादशी निमित्ताने भजन ,अभंग गायन ,पालखी मिरवणूक आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विठ्ठल नामात सर्व दंग झालेले विद्यार्थी तुळस डोक्यावर धरून, नऊवारी साडी नेसलेल्या लहान विद्यार्थिनी, वारकरी वेशभूषाचे पांढरे कपडे परिधान करून गळ्यात टाळ आणि विणा धारण करून चिमुकले विठू नामाचा गजर करत होते.
शिक्षक वर्गाची उपस्थिती
            यावेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी यांनी पालखीचे पूजन केले शाळेतील शिक्षिका सुरेखा सोनगडकर,जयश्री भोसले,मंगला चौधरी,वर्षा चुंबळकर,चारुशीला पाटील,रुचिता पाटील,अश्विनी चौधरी, देवयानी पाटील,सुरेखा सैंदाणे,जोत्स्ना भोसले,नयनतारा सैंदाणे,मुस्कान ढिगराई व इतर शिक्षक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.