*अमळनेर -* अमळनेरचे सुपुत्र व हेमंतकुमार म्युझिकल्स या यू ट्युब चॅनलच्या माध्यमातून संगीत विश्वात ज्यांचे लाखो फॉओअर्स व कोट्यवधी व्हिवरशिप आहे असे डॉ. हेमंतकुमार महाले यांनी निर्माता व दिग्दर्शकाच्या भुमिकेतून साकार केलेला ‘काळी माती’ हा पहिलाच चित्रपट आज शुक्रवार, दि.२६ डिसेंबर रोजी अमळनेर येथील ‘एसएस मल्टिप्लेक्स’ येथे सकाळी ११ वाजता प्रदर्शित होत आहे. अमळनेरसह राज्यात विविध ठिकाणीही ‘काळी माती’ हा चित्रपट झळकणार आहे.
सदर चित्रपटाला एका वर्षात ४४४ सर्वोत्तम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यास इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने मान्यता दिली आहे. आता सदर चित्रपटासाठी डॉ. श्री. महाले यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे अर्ज केला आहे.
विशेष म्हणजे डॉ.श्री. महाले गेल्या ५ दशकांहुनही अधिक काळापासून हेमंतकुमार ॲण्ड पार्टी व हेमंतकुमार म्युझिकल्स या शिर्षकांच्या माध्यमातून जगभरात गीत, संगीत व नृत्याचे जगभर शो करीत आहेत. त्यांच्या नावावर अनेक प्रतिष्ठीत रेकॉर्डस् आहेत. कित्येक नामवंत पारितोषिकांनी ते सन्मानित आहेत. स्वतःच्या मध्यमवर्गीय परिवाराला संगीत व चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना श्री. महाले यांनी सिने व संगीत क्षेत्रात मिळविलेली किर्ती अत्यंत कौतुकास्पद व या क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. संगीत व सिने क्षेत्राचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता. कोठेही रितसर प्रशिक्षण घेतलेले नव्हते. तरीही त्यांनी या क्षेत्रात केलेली प्रगती विशेष अभिमानास्पद व अभिनंदनीय ठरते. त्यांच्या म्युझिकल ग्रुपमध्ये मंगेशकर परिवारासह देशातील सर्वच्या सर्व दिग्गज गायक व वादक यांचा समावेश राहिला आहे. अनेक उभरत्या कलाकारांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले आहे. हेच कलावंत आज डॉ.श्री.महाले यांच्या कृपाशिर्वादाने उत्तम नावलौकिक व पैसा कमवित आहेत.
काय आहे चित्रपटाची कथा
सदर चित्रपट हा सत्य संघर्ष कहाणीवर आधारित आहे. ज्या शेतकऱ्याची ही गौरवगाथा आहे, त्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी खास पाचारण करून त्याचा सन्मान केला आहे, हे विशेष!
आवाहन
अमळनेरकरांनी आपल्या लेकराचा हा चित्रपट आवर्जुन पाहावा असे आवाहन डॉ.श्री. महाले यांनी अमळनेरकरांना विशेष विनंती करून केले आहे.
