जळगाव - गेल्या महिन्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे.जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी गावोगावी भेटी देऊन प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या दालनात नुकसानीचा आढावा घेतला असून केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार नुकसानीच्या तिप्पट भरपाई मिळावी अशी मागणी आज खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे. गुरुवारी सायंकाळी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव जिल्हा कृषी अधिकारी एस के ठाकूर यांच्या दालनात आढावा घेतला. यावेळी त्यांनी तिप्पट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हा कृषी उपआयुक्त अनिल भोकरे, संजय पवार, कावेरी पाटील, रमेश बागुल व कर्मचारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे कोरडवाहू व बागायती दोन्ही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत मिळावी, फळ बागायतदार शेतकऱ्यांना १ लक्ष रुपयांची मदत मिळावी यासह रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना बियाणे व खत खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.राज्याच्या कृषी सचिवांची भेटही घेतली असून शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रक्रिया पूर्ण करण्यासबंधीचे पत्रही दिले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अन्नदाता शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून माझे प्रयत्न राहतील.कमी अधिक नुकसान असा भेदभाव न करता सरसकट तिप्पट नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशिल आहे
- खासदार उन्मेश पाटील
याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी राज्यपाल महोदयांकडे बैठक असून त्यावेळी यावर निर्णय होईल अशी माहिती दिली.
कपाशी क्षेत्र वाढले ?
जिल्हयात कपाशीचे पंचनामे करतांना जिल्ह्यात विशेषतः पाचोरा भडगाव चाळीसगाव जिरायत पीक दाखविण्यात आले होते. ही बाब खासदार पाटील यांच्या निदर्शनात आली. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांकडे ही बाब मांडली त्यांनीही तात्काळ दुरुस्ती करावी अशी सूचना जिल्हा कृषी अधिकारी यांना केल्याने कपाशीचे क्षेत्र दुप्पटीने वाढून दोन लाख हेकटर झाले आहे.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
No comments
Post a Comment