अमळनेर - मोटार सायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांनी मारवड रस्त्यावर नाकाबंदी करून मोटर सायकल चोरणाऱ्या पाडळसरे येथील एका तरुणास अटक केल्याची कारवाई केली आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आणखी २ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्या मोटारसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी मारवड रस्त्यावर पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद भामरे, ईश्वर सोनवणे याना नाकाबंदी करायला लावून वाहन तपासणी केली. या वेळी पाडळसरे येथील अभिजित पाटील (वय २६) हा तरूण विना नंबरची मोटरसायकल घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी या मोटारसायकलीची तपासणी केली असता त्याने इंजिन नंबर आणि चेसिस नंबर खोडलेला आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने आणखी दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केले असता न्या.अग्रवाल यांनी त्यास दि.१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
No comments
Post a Comment