अमळनेर-येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत बालदिनाचे औचित्य साधत अमळनेर न्यायालयातील सर्व सन्माननीय न्यायाधीशांनी शाळेच्या विद्यार्थ्याना बिस्कीट, चॉकलेट,फळ वाटप करून बालकांच्या आनंदात उत्स्फूर्त सहभागी झाले. संपुर्ण न्यायालयच सरस्वती विद्या मंदिर येथे अवतरल्याने आश्चर्यचकित झालेले विद्यार्थी व शिक्षक वृंद विस्मयकारक आनंदाने भारावून गेले होते.यावेळी सरकारी वकील तसेच वकील असोसिएशनचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिल्याने एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.
न्यायदानाच्या कायदेविषयक जबाबदारीशिवाय आमचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून बालवयात मौजमस्ती करणाऱ्या बालकांच्या आनंदात बालदिनानिमित्त सहभागी होण्याचा आनंद अद्वितीय आहे - न्या.व्ही.आर.जोशी
यांची होती उपस्थिती जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मा. व्ही आर जोशी , जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे, दिवाणी न्यायाधीश मा.आर एम कराडे ,प्रथम न्यायदंडाधिकारी वाय.जी.वळवी यांचेसह सरकारी वकील अँड. शशिकांत पाटील,आर.बी.चौधरी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.किरण बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पं.जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी प्रास्ताविकात बालदिन हा पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचे प्रतिक आहे असे प्रतिपादन केले. जेष्ठ सरकारी वकिल अॅड.शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात आंनददायी वातावरण पोषक ठरते विद्यार्थ्यांना बालपणाचा सुखद काळ जास्तीत जास्त उपभोगता यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
न्यायमूर्तीनी विद्यार्थ्यांना वाटले फळ व चॉकलेट
बालदिन साजरा करतांना जिल्हा न्यायाधीश व्ही आर जोशी , जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे, दिवाणी न्यायाधीश आर एम कराडे ,प्रथम न्यायदंडाधिकारी वाय.जी.वळवी यांचेसह जेष्ठ सरकारी वकील अॅड. शशिकांत पाटील, अॅड आर.बी.चौधरी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.किरण बागुल आदी मान्यवरानी स्व: हस्ते उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनिंना चॉकलेट, बिस्किट पुडे व फळ वाटप करून विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला.
संपुर्ण न्यायालयच सरस्वती विद्या मंदिर येथे अवतरल्याने आश्चर्यचकित झालेले विद्यार्थी व शिक्षक वृंद विस्मयकारक आनंदाने भारावून गेले होते. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ.संगिता पाटील,सौ.गीतांजली पाटिल, आनंदा पाटील, परशुराम गांगुर्डे, धर्मा धनगर,ऋषीकेश महाळपूरकर ,सौ. संध्या ढबु आदि उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदासह अमळनेर न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक आर पी दुसाने, कर्मचारी के बी वाघ, सचिन जगताप,निलेश पाटील आदिंनी परिश्रम घेतले.
No comments
Post a Comment