अमळनेर- काल्पनिक अधिष्ठान दाखवून गरीब व सामान्य जनतेचे शोषण करण्यात येते.ही एक प्रकारे अंधश्रद्धा असून त्यास विरोध दर्शविला पाहिजे. देव- धर्माच्या नावाने शोषण करणाऱ्या व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मुलन करणे होय असे प्रतिपादन येथील आय.एम.ए. हॉल,जी.एस.हायस्कूल येथे सुरु असलेल्या प्रेरणादीप व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प गुंफतांना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष, मा.अविनाश पाटील यांनी केले. बोलत होते. 'मंतरलेली अंधश्रद्धा' या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ होते.प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेच्या आमदार सौ. स्मिताताई वाघ व जी.एस.हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडा, सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य डी.ए.धनगर, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, होते.
अविनाश पाटील पुढे म्हणाले की , मंतरलेली अंधश्रद्धा म्हणजे मंत्र मारलेली किंवा भरावलेली ,एखाद्या गोष्टीने प्रभावित केलेली श्रद्धा होय.श्रध्दा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करता आली तर तो विश्वास होतो.तर अंधश्रद्धा निर्मुलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे शिकणे होय.माणसाचा विवेक उन्नत करते ती 'श्रद्धा' व विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा होय.अनुकरणातून अंधश्रद्धा बळावत असते.त्यात महिलांच्या अंधश्रद्धा ह्या पराकोटीच्या असतात.राजकीय , सामाजिक क्षेत्रातही मंतरलेली अंधश्रद्धा आहे.अंधश्रद्धेत धर्माची जोड दिली जाते तर अंधश्रद्धा निर्मुलनात धर्माला स्थान नाही.म्हणून जनमानसातील अंधश्रद्धेला तिलांजली दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. सौ.स्मिताताई वाघ म्हणाल्या, की अंधश्रद्धा ही व्यक्तीनिष्ठ असते. महिलांनी ही अंधश्रध्देमध्ये गुंतू नये. अध्यक्षीय भाषणातून उदय वाघ यांनी सानेगुरुजी चा विचार जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले.समता व बंधुभाव नांदला पाहिजे त्यासाठी असे वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजे. त्यांनी प्रेरणादीप व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.ए.धनगर यांनी केले.वक्त्यांचा परिचय विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी करून दिला.सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.
यांचा झाला सत्कार - उत्कृष्ट शाळा म्हणून विजयनाना पाटील आर्मी स्कूल, प्राचार्य एस यु पाटील, चंद्रकांत पाटील(जि. प.शाळा शिरूड), विजयसिंग पवार,शिरसाळे, वसुंधरा लांडगे, अमळनेर,प्रा.विलास पाटील, प्रा.रवींद्र माळी, रवींद्र पाटील,पिंगळवाडे, हेमकांत लोहार, डॉ शरद पाटील याचा समावेश होता.
No comments
Post a Comment