मंगळ ग्रह मंदिरात रंगला तुलसी विवाह महासोहळा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

Tuesday, November 12, 2019

/ by Amalner Headlines


अमळनेर - येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात आज दरवर्षी प्रमाणे भव्य स्वरुपात तुलसी विवाह महासोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पूजेच्या अकरा मानकऱ्यांपैकी
बाजार समितीचे व खा.शि.मंडळाचे संचालक हरी भिका वाणी मुख्य यजमान होते. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे,तहसीलदार संदीप वाघ , माजी नगरसेवक संजय पाटील,सोनार-सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वर्मा, 'डीपीडिसी'चे सदस्य पंकज चौधरी,उपप्राचार्य प्रा. प्रवीण भावसार,प्रतिष्ठित व्यापारी दामुशेठ गोकलानी  , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब महाजन , जे. डी. कोठावदे, संजय सोनजे मानकरी होते.  संजय एकतारे आणि सुनील वाघ यांनी वर व वधूच्या मामाची भूमिका निभावली.
तत्पूर्वी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पालखी पूजन करून मानकऱ्यांचे स्वागत केले.
यावेळीआमदार सौ.स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील व , जि. प.सदस्या जयश्री पाटील , जेष्ठ नेत्या ऍड. ललिता पाटील,तिलोत्तमा पाटील,  आदींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दीक्षित व जयेंद्र वैद्य तसेच शहरातील काही पुरोहितांनी सहकार्य केले.
यावेळी तुळशीच्या कुंडीला साक्षात वधू राणीच्या वेषात सजविण्यात आले होते.विवाह मंडपात प्रतीक स्वरूपात भगवान श्रीकृष्णाचीही मूर्ती होती. मंदिर व परिसराला अत्यंत मनोहारीरित्या पाने,फुले, केळीचे खांब,रांगोळ्या व रोषणाईने सजविण्यात आले होते. सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस. एन.पाटील,सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम,खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे  सेवेकरी सौ. सुनीता कुलकर्णी, उज्वला शाह आदींनी परिश्रम घेतले. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines