संत गुरुनानक देव ५५० वी जयंती उत्साहात साजरी ढोल-ताशांच्या गजरात निघाली मिरवणूक

Sunday, November 10, 2019

/ by Amalner Headlines




अमळनेर - संत गुरूनानक देव यांचा ५५० वा जयंती महोत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमळनेर येथील सिंधी व शिख समाज बांधवांच्या वतीने  संत गुरूनानक देव यांच्या प्रतिमेची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. 
   येथील तोलाणी मार्केट मधील गुरूद्वारा येथून मिरवणूकीचा प्रारंभ झाला. सुभाष चौक,लालबाग शॉपिंग सेंटर,पोस्ट ऑफिस चौक,स्टेट बँक,न.पा.कार्यालय मार्गे निघालेल्या मिरवणूकीचा गुरूद्वारा येथे समारोप करण्यात आला. 


सामाजिक कार्यकते॔ महेश पाटील यांचा सत्कार केले हरी भाई साहेब तोलाणी यांनी
 
मिरवणुकीत सिंधी व शिख समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुक मार्गावर चहा,पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
महिलांचे ढोल-ताशा पथकाच्या गजरात व 'धन गुरूनानक सारा जग तारीया' च्या जयघोषात व फटाक्यांच्या आतिशबाजीत निघालेली मिरवणूक  सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.




या मिरवणूकीत सिंधी व शिख समाज बांधवांसोबतच महिला वर्गाचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. 
    अमळनेरचे नवनिर्वाचित आमदार अनिल भाईदास पाटील,आ.सौ. स्मिता ताई वाघ,मा.आ.शिरीष चौधरी,सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनीही मिरवणूकीत सहभागी होऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. 


 प्रशासनाचे उत्कृष्ठ सहकार्य -         मिरवणुक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे उत्कृष्ठ सहकार्य लाभले. अमळनेरचे पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे स्वतः मिरवणूकीत सहभागी झाले होते. सपोनि एकनाथ ढोबळे,पो.कॉ.शरद पाटील,दिपक माळी,हितेश चिंचोरे,राजेंद्र पाटील  जितेंद्र बाविस्कर भूषण बाविस्कर  रविंद्र पाटील योगेश महाजन यांनी सहकार्य केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines