सिंधी कॉलनी व शहरातील तोलाणी मार्केट या दोन्ही ठिकाणी यानिमित्ताने गुरू ग्रंथसाहेब स्थापना व पूजन,प्रभातफेरी,किर्तन,सत्संग, मिरवणूक,लंगर महाप्रसाद,फटाक्यांची आतिशबाजी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील श्री गुरूनानक नगर (सिंधी कॉलनी)भागात सकाळी ४:१५ वा.संत बाबा थाहिरियासिंग गुरूद्वारा येथे हरी भाईसाहेब यांच्या हस्ते गुरूग्रंथ साहेबची स्थापना करण्यात आली.
भाई विशनदास दरबार येथून सकाळी ९:३०वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत सिंधी व सिख समाज बांधव,महिला,युवा मित्र मंडळ उत्साहाने सहभागी झाले होते. गुरूनानक देव यांचा चित्ररथ सजविण्यात आला होता. मिरवणूकीनंतर ४० दिवस अखंड पाठ (जपजी साहेब)सुरू असलेल्या नाम मंत्रजपाची समाप्ती करण्यात आली.
दुपारी लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता संत बाबा थाहिरियासिंग दरबार येथे ५५० पणत्या लावून दिपोत्सव साजरा व अल्पोपहार वाटप करण्यात आला.
त्याचप्रमाणे शहरातील सिंधी हौसिंग सोसायटी (तोलाणी मार्केट)मधील भाई लुधडासिंग दरबार गुरूद्वारा येथे सायंकाळी ५ वाजता सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. रात्री ८:३० वाजता लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सिंधी कॉलनी व शहरात धुमधडाक्यात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भाईसाहेब घनश्यामदास तोलणी,जितुुु भाईसाहेब,हरी भाईसाहेब,पदीप भाईसाहेब, गोपीचंद महाराज,संजय महाराज, किशन महाराज,गोविदराम आहूजा,राम मल्कानी ,बलराम अंदाणी, दिलीप जगमलानी, गोरधन डावराणी,नरेश पंजवानी,राजकुमार वाधवाणी, गुरूनामल बठेजा,रोहीत बठेजा,सुनील बठेजा, अजितसिंग लुल्ला ,कृपालसिंग लुल्ला, दिलीपसिंग लुल्ला, दिनेशसिंग लुल्ला, घनश्याम थदानी, जितेंद्र डिंगराई, कर्तारसिंग , बलवंतसिंग लुल्ला, श्याम गोकलाणी,कैलास नागदेव, अमर माधवानी, विशाल थदानी,प्रकाश जग्यानी, रविंद्रसिंग लुल्ला, आदींसह पू.जनरल सिंधी पंचायत व शहर पंचायत व सिंधी समाज मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments
Post a Comment