उपमुख्याधिकारी हल्ला प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

Thursday, November 14, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर – अमळनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचेवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पकडण्यात अमळनेर पोलीसांना अखेर यश आले आहे. संशयित आरोपी दादू धोबी व आकाश शिंदे या दोघांना पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. 
   न.पा.चे उपमुख्याधिकारी  प्राणघातक हल्ला प्रकरणातील एक आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली परंतु या घटनेतील अन्य दोन आरोपी  सापडत नसल्याने अमळनेर पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते .त्या घटनेच्या अनुषंगाने  पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या संपुर्ण टीमच्या वतीने कसून तपास चालू होता.आज सकाळी दादू धोबी आणि आकाश शिंदे या दोघांना  अटक करण्यात आली आहे. सदर  आरोपींवर नगरपालिका उपमुख्याधिकारी  संदीप गायकवाड यांच्यावरील हल्ला तसेच जुन्या बसस्टँड परिसरातील घरफोडी, देवळी नगाव दरम्यानच्या  रस्ता लुट या प्रकरणीही संशय व्यक्त केला जात होता. आरोपी आकाश शिंदे व दादू धोबी यांना  भल्या पहाटे  अमळनेर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. २ वरून अटक केली आहे. पो.नि अंबादास मोरे, मिलींद भामरे, ईश्वर सोनवणे, जे. डि. पाटील, शरद पाटील,दिपक माळी,यांचे टीमने ही यशस्वी कारवाई केली.नागरिकांच्या वतीने व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे. 
आमदारांचे प्रशासनास निवेदन
 नवनिर्वाचित आमदार अनिलदादा  पाटील यांनी देखिल संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणात  पोलिस प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करून आरोपीना जेरबंद करण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच अमळनेर तालुक्यात  वाँश ऑउट मोहीम राबवावी असे देखिल आदेश देण्यात आले आहेत.

पत्ता कोबडी बजार अमळनेर.जि जळगाव
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines