मुंबई : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. खरीप पिकांसाठी ८००० रुपये प्रति हेक्टर (अडीच एकर) आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे.
यासोबतच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्कही माफ करण्यात आले आहे.
अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीतून सावरण्यासाठी शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी सर्व राजकीय पक्ष,विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था व संघटनांनी राज्यपालांकडे केली होती. राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नसल्याने राज्यपालांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला आहे.
ओम टी पान मसाला च्या नविन दालन
No comments
Post a Comment