पू. सानेगुरुजी न.पा. कर्मचारी पतपेढी चेअरमनपदी सोमचंद संदानशिव बिनविरोध
अमळनेर - अमळनेर नगरपरिषदेच्या पूज्य सानेगुरुजी कर्मचारी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी भारतीय कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी(इंटक) चे सोमचंद संदानशिव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल महाजन यांच्या उपस्थितीत निवड सभा घेण्यात आली. त्यांना संस्थेचे सचिव प्रदीप कुळकर्णी यांनी सहकार्य केले. सदर निवड बिनविरोध होण्यासाठी संस्थेचे संचालक चंद्रकांत संदानशिव,शेखर देशमुख प्रसाद पाटील ईश्वर पाटील इक्बाल पठाण भाऊसाहेब पाटील सलीम शाह यांनी प्रयत्न केले. नवनिर्वाचित चेअरमन सोमचंद संदानशिव यांचे निवडीबद्दल जेष्ठ कामगार नेते आण्णासाहेब रामभाऊ संदानशिव,प्रा.डॉ विजय तूंटे, संजय चौधरी,शिवाजी महाराज गार्डन गृपचे पर्यांक पटेल,प्रवीण पारख,अँड.ब्रह्मे,प्रा अशोक पवार,घोरपडे सर,पत्रकार किरण पाटील, चेतन राजपूत,गोपीचंद चव्हाण, ज्ञानेश्वर संदानशिव, चंद्रकांत शिंगाने यांचेसह सर्व कर्मचारी व हितचिंतकानी अभिनंदन केले आहे. अमळनेर हेडलाईन्स तर्फेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment