अमळनेर - थोर क्रांतिकारक,समाज सुधारक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दि.१५ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभर साजरी करण्यात आली. त्यानिमीत्त विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. अमळनेर येथे लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा तालुक्यातील दहिवद तलाठी कार्यालयास तलाठी आप्पांना प्रतिमा दिली आहे ग्रामपंचायत ग्रामसेवकास नाही कार्यालय व अमळनेर नगर परिषद कार्यालयास भेट देण्यात आली.
दहिवद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी प्रतिमा स्विकारली. तर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी प्रतिमा स्विकारली. यावेळी आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश अध्यक्ष पन्नालाल मावळे,उपाध्यक्ष मधुकर चव्हाण प्रकाश पारधी अविनाश पवार बालीक पवार दहिवद ग्रामपंचायत सदस्य देवानंद बहारे सामाजिक कार्यकर्ते भुषण भदाणे आदींची उपस्थिती होती. |
No comments
Post a Comment