अमळनेर - श्री गुरूनानक देव यांच्या ५५१ व्या प्रकाशपर्व वर्षानिमित्त दि.१९ नोव्हेंबर पासून अखंड नाम जप सेवा प्रारंभ करण्यात आली आहे.
येथील सिंधी कॉलनीतील संत बाबा थाहिरियासिंग दरबार गुरूद्वारा येथे २४ तास अखंड नाम जप सेवा करण्यात येत आहेत तर दररोज रात्री ९:४५ ते १०:१५ वाजेपर्यंत होत असलेल्या जपजी पाठ सेवेत सर्वांना सहभागी होता येणार आहे.तरी भाविक भक्तांनी या पाठात आपली सेवा द्यावी असे आवाहन संत बाबा थाहिरियासिंग दरबार व आदी अम्मा गृप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment