किराणा दुकानाचे नुकसान करून मालकास धमकी देणारा आरोपी अटकेत २२ पर्यंत पोलीस कोठडी

Wednesday, November 20, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर - येथील स्टेशन रोड, मुठे चाळ भागातील जीवनानी किराणा या दुकानाच्या काउंटरचा  काच फोडून दुकानदारास धमकी देत गल्ल्यातून रोख रक्कम काढून नेणारा आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.अग्रवाल यांनी त्यास दि. २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  सदर आरोपी एका प्रकरणात तुरुंगात होता,तेथून नुकताच तो सुटला होता असे कळते.
   याबाबतची सविस्तर माहिती अशी की,स्टेशन रोड,मुठे चाळ येथे प्रकाश नोतनदास जीवनानी यांचे जीवनानी किराणा या नावाने  दुकान आहे.या दुकानावर दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रमण ऊर्फ माक्या बापू नामदास हा युवक आला. त्याने ब्लेड व बिस्किटे मागितली. दुकानदार प्रकाश याने देण्यास नकार दिला असता रमण याने दुकानातील नारळ उचलले आणि दुकानाच्या काउंटरवर आपटून काच फोडली. तसेच बाहेरील बाजूस ठेवलेला पाण्याचा जार लाथ मारून पाडला. त्यामुळे दुकानातील साहित्य ओले झाले. त्यानंतर रमण याने फुटलेला काच हातात उचलून धाक दाखवत प्रकाश यास पोलीसात तक्रार दिली तर जीवे ठार मारण्याची व दुकान जाळून टाकेन अशी धमकी दिली.तसेच धाक दाखवून दुकानाच्या गल्ल्यातून ३२९० रुपये काढून नेले. दुकानदार प्रकाश नोतनदास जीवनानी यांनी आरोपी रमण ऊर्फ माक्या बापू नामदास याच्या विरूध्द पोलीसात तक्रार दाखल केली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३९४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पाटील दिपक माळी पूनम हटकर व सपोनि प्रकाश सदगिरे पुढील तपास करीत आहेत. 
  सदर आरोपी हा काही दिवसांपूर्वी शहरातील एका कापड दुकानातून बिल न देता धाक दाखवून रेडीमेड कपडे घेऊन जाण्याच्या प्रकरणातील आरोपी असून त्याप्रकरणी तो तुरूंगात होता.तेथून सुटका झाल्यानंतर काही दिवसातच याप्रकरणी त्यास पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याला दि.२२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines