सन २०१८ मधील थकीत पिक विमा रक्कम त्वरीत मिळावी एकनाथराव खडसे,खा.खडसे यांची विमा कंपनीकडे मागणी

Tuesday, November 19, 2019

/ by Amalner Headlines

जळगाव -  जिल्ह्यात सन २०१८ या  खरीप हंगामासाठी   घेतलेल्या पिक विमा योजनेतील १८१ शेतकरी विमाधारकांना त्यांच्या विम्याचा लाभ काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप पावतो मिळालेला नाही. यासंदर्भात  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन सौ रोहिणी ताई खडसे व  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. परंतु ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अद्याप पावेतो विमा लाभ रक्कम शेतकरी विमाधारकांना पाठवलेली नाही. यासंदर्भात माजी मंत्री  एकनाथराव खडसे व खा. रक्षाताई खडसे यांनी आज (दि.१९ रोजी) विमा कंपनीचे चेअरमन श्री गिरजा कुमार व जनरल मॅनेजर श्री सौम्या यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन कंपनीकडून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत  विमा रक्कम जमा करण्यासंदर्भात भेट घेतली. यावेळी जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व सरव्यवस्थापक एम. टी.चौधरी हे हजर होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines