अमळनेर - येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने नुकत्याच उत्स्फूर्त भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जळगाव जिल्ह्यातील सहा शाळांनी यामधे सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेमध्येे सहभागी विद्यार्थ्यांना ऐनवेळी दिलेल्या विषयावर अडीच मिनिटात आपले मत व्यक्त करायचे होते.यातुन विद्यार्थ्याची समयसुचकता तसेच बौद्धिक पातळी समजत होती.यावेळी उच्चार,सादरीकरण,भाषणातील संदेश,हावभाव,विषयाची सुरुवात आणि सांगता यांवरुन विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा शाम पाटील हे होते तर पर्यवेक्षक म्हणून प्रा लिलाधर पाटील,विनोद जाधव हे होते.यावेळी प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता आठवी मध्ये प्रथम क्रमांक खुशी तेली(निर्मल इंटरनॅशनल स्कुल,पाचोरा),द्वितीय रोनीत जितेंद्र पवार(अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल,अमळनेर),इयत्ता नववी मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी प्रकाश पाटील(अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल),द्वितीय क्रमांक सिया अग्रवाल(पंकज ग्लोबल स्कुल,चोपडा),इयत्ता दहावी मधे प्रथम क्रमांक हर्षिका पवार(निर्मल इंटरनॅशनल स्कुल), द्वितीय क्रमांक अथर्व दत्तात्रय जोशी(अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल)ह्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी नागराज माळी,एस जे पठाण,एम ए पठाण,जितेंद्र वाणी,मंगला चौधरी,विक्रम संदानशिव,केदार देशमुख,व्हि एन सुर्यवंशी यांनी परीश्रम घेतले.सुत्रसंचालन मेघा पाटील यांनी केले तर आभार वर्षाली सावंत यांनी मानले.
No comments
Post a Comment