अमळनेर - शहरातील अलफैज उर्दू मुलींचे हायस्कूलमध्ये शासनाच्या कौमी एकता सप्ताहानिमित्त बाल हक्क व संरक्षण, तसेच बाल गुन्हेगार, बाल मजुरी आणि महिलांना कायद्याचे संरक्षण या विषयावर पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक तसेच महिला प्रदेश सचिव सौ रिता भुपेंद्र बाविस्कर या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष श्री. उमेश पाटील, अँड. काजी साहेब, पञकार मुन्नाभाई शेख, हायस्कूलचे चेअरमन श्री. शरीफदादा ईस्माईल,मुख्याध्यापक खान आलिया मँडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.या कार्यक्रमास सुमारे १५० विद्याथींनी उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment