संविधानाचे जतन हे आपले कर्तव्यच -विलासराव पाटील

Tuesday, November 26, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर - भारतीय संविधानामुळे जगातील सर्वात मजबूत लोकशाही आपल्या देशात आहे.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि समान संधी मिळवून दिली असे प्रतिपादन विलासराव पाटील यांनी केले. देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
        कार्यक्रमाच्या सुरूवातीस   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले.
विलासराव पाटील पुढे म्हणाले की  सामाजिक समतेचा पाया अधिक मजबूत केला तरच राजकीय लोकशाही राजकीय समता टिकेल .स्वातंत्र्य, समता ,बंधुता यातील तत्वातील एक तत्व जरी कळाले तरी सर्व लोकशाहीचा अंत झाल्यासारखे होईल. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली नाही तर सामाजिक आणि विषमतेची  दाहकता भोगणारा वर्ग लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही .असा इशारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. 

 संविधानिक मार्गाने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातूनच संविधानातील खरा भारत आपण  साकारू शकतो. 
  -विलासराव पाटील,अध्यक्ष
 म.फुले हायस्कूल,देवगाव-देवळी

               शाळेत संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यात प्रथम - खुशी डांगे (इयत्ता १० वी), द्वितीय -अश्विनी महाजन (इयत्ता ९ वी), तृतीय- यशस्वी पाटील (इयत्ता आठवी) उत्तेजनार्थ- नेहा पाटील (इयत्ता नववी), रजनी माळी( इयत्ता आठवी) यांना अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शाळेचे शिक्षक आय.आर. महाजन यांच्याकडून बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना पाच पुस्तके देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. के महाजन यांनी केले परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच.ओ माळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines