शिवाजी नगर शिवसेना शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Sunday, November 17, 2019

/ by Amalner Headlines



अमळनेर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतीदिन आज येथील शिवाजी नगर शिवसेना शाखेतर्फे भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.प्रभाग क्र.१५ शिवाजी नगर,शिरूड नाका परिसरातील स्व.बाळासाहेब ठाकरे चौक याठिकाणी असलेल्या स्मारकासमोर रांगोळी काढून व दिव्यांची सजावट करण्यात आली होती. 
      शिवसेना शहर प्रमुख प्रताप आबा शिंपी,उप शहर प्रमुख जीवन पवार व शाखा प्रमुख विनोद निकुंभ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शिवसैनिक व नागरिकांनीही फुले वाहून अभिवादन केले व भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विनोद मिस्त्री अजय पाटील भैय्या पाटील लहू पाटील सागर बडगुजर कैलास बडगुजर जयेश पाटील यांचेसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines