अमळनेर - हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ८ व्या राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन अजिंक्यपद स्पर्धेत अमळनेर येथील खेळाडूंनी बक्षिसे मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दि. २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये अमळनेरच्या खेळाडूंनी बेल्ट व मास रेसेलींग क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेऊन बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे.
या स्पर्धेसाठी देशातील एकूण २३ राज्यांनी सहभाग घेतला होता.अधिकाधिक खेळांमध्ये प्रथम क्रमांक आणि 90 सुवर्ण पदके घेऊन महाराष्ट्राने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला.
तर दुसरा क्रमांक मणिपूरने व
तिसरा क्रमांक तेलंगणा राज्याने मिळविला.
आपल्या अमळनेरच्या खेळाडूंची कामगिरी सब ज्युनिअर मधून मयुर पाटील याने -३२ किलो वजन गटातून मास आणि बेल्ट रेसलींग मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तसेच मयुरेश चौधरी ने -३७ किलो वजन गटातून मास रेसलिंग मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. आणि रोहित सूर्यवंशी याने -४२ किलो वजन गटातून बेल्ट रेसलिंग मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तसेच ज्युनियर गटातून
मनोज पाटील याने -७४ किलो वजन गटातून बेल्ट मध्ये सुवर्णं पदक तर मास रेसलिंगमध्ये कास्य पदक प्राप्त केले.तसेच
सिनियर गटामधून
यज्ञेश जगताप याने -७४ किलो वजन गटातून बेल्ट रेसलींग मध्ये कास्य पदक प्राप्त केले आहे. मनोज हा नगरसेवक संजय कौतिक पाटील यांचा तर यश हा नगरसेवक प्रताप शिंपी यांचा मुलगा आहे.
या सर्व खेळाडूंना कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक सचिन वाघ सर, कोंडाजी व्यायाम शाळा,पैलाड,जयहिंद व्यायाम शाळा,शिरूड नाका यांनी मार्गदर्शन केले आहे. सर्व विजेत्या खेळाडूंवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल त्यांचे शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे,तालुका प्रमुख विजय पाटील,डी.डी.नाना पाटील,व.ता.आबा पाटील, राजू फापोरेकर, नितीन निळे,जीवन पवार आदींसह अमळनेरातील क्रिडा प्रेमी मंडळींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
No comments
Post a Comment