संविधान गौरव दिनानिमित्त आज व्याख्यानाचे आयोजन

Tuesday, November 26, 2019

/ by Amalner Headlines
"भारतीय संविधानाचे योगदान" या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ अध्यक्षस्थानी राहतील. शिक्षण विस्ताराधिकारी अशोक बिऱ्हाडे (धरणगाव), प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.ओ. माळी, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.देशमुख तसेच विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य एस.यु.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे), दर्शना चौधरी (शिरूड) तसेच साने गुरुजी   शिक्षक पतसंस्थेच्या नूतन अध्यक्षा सुलोचना पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे असे आवाहन शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी केले आहे.


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines