अमळनेर - येथील माजी उपनगराध्यक्ष व अर्बन बॅकेचे संचालक लालचंद हेमनदास सैनानी यांनी आपल्या सतत सुरू असलेल्या समाजोपयोगी उपक्रमातून गोरगरीब गरजू नागरिक व वाहनचालक यांचा थंडीपासून बचाव व्हावा याकरिता ब्लॅंकेटस् वाटप केले.त्यांच्या पेट्रोल पंपावरील गाड्यांमधील चालकांना गावोगावी फिरावे लागते.त्यातच मोठ्या प्रमाणात येत्या काळात वाढणारी थंडीपासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून तसेच शहरातील पैलाड भागातील शनी मंदिराबाहेर असलेल्या गोरगरीब व भिकाऱ्यांचाही थंडी पासून बचाव व्हावा म्हणून नुकतेच ब्लॅंकेटस् वाटप करण्यात आले.यावेळी ईसार कंपनीचे सेल्स ऑफिसर उदित साबू, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र लांडगे,निलेश सैनानी,वसीम मिर्जा उपस्थित होते.लालचंद सैनानी यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल वाहन चालक व गरजू नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच श्री सैनानी यांचे आभार मानले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment