अमळनेर - जगातील सर्वात मोठ्या यशस्वी लोकशाही देशाचे सर्वात मोठं भारतीय संविधान असल्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा असे आवाहन सरस्वती विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले.विद्यार्थ्यांच्या हातात संविधानाची प्रत प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने संविधान दिवस खऱ्या अर्थाने साजरा झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांना मिळाले.
संविधान दिवसानिमित आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी भारतीय संविधानाची मूलभूत वैशिष्ठ्य हातात संविधानाची प्रत घेऊन सांगितली .संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सामुहिकपणे संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भारतीय संविधानाची प्रत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठ्या कुतूहलाने बालकांनी भारतीय संविधान न्याहाळले.
No comments
Post a Comment