अमळनेर - भारतीय संविधान गौरव दिन येथील न.पा.कार्यालयात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी याउद्देशाने संपूर्ण देशात दरवर्षी दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.नागरीकांना स्वातंत्र्य , समानता व बंधुतेचा हक्क प्रदान करणारी भारतीय राज्यघटना आहे. यानिमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांनी केले. यावेळी न.पा.प्रशासन अधिकारी श्री.संजय चौधरी, समस्त नगरसेवक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment