जळगाव - उत्तर महाराष्ट्र विभागासह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसात अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.या संकटाचा शहरी व ग्रामीण भागातही मोठा परिणाम दिसून येत आहे.त्यामुळे आपल्या विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन विद्यापीठ विकास मंचच्या सिनेट सदस्यांनी आज कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांना दिले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विभागात मागील काही दिवसात अवेळी अतिवृष्टी झाल्याने सर्वच घटकांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी वर्गासही आर्थिक दिलासा देणे आवश्यक असल्याने विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ केल्यास विद्यार्थी वर्गास मोठा आधार मिळू शकेल असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. आपल्या विद्यापीठ क्षेत्रातील सर्वच विद्यार्थ्यांना या शुल्क माफीचा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी मागणी कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी करण्यात आली. यावेळी सिनेट सदस्य नितीन ठाकूर, दिनेश नाईक, मनिषा चौधरी,नितीन झाल्टे,शब्बीर सय्यद,अमोल मराठे,अमोल पाटील,दिनेश खरात,सुरेश पवार पाटील,राजेंद्र जाखडी,राजेंद्र नन्नवरे आदींची उपस्थिती होती.
- दिनेश नाईक,सिनेट सदस्य
No comments
Post a Comment