अमळनेर - येथील बस स्थानकावर एका प्रवासी महिलेची हरवलेली पर्स कर्तव्यावर असलेल्या पोलीस व होमगार्डच्या कर्तव्यदक्षतेमुळे महिलेस परत मिळाल्याची घटना आज येथे घडली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मालेगाव येथील रहिवासी असलेल्या नजमबी नसीर खान यांची पर्स अमळनेर बस स्थानकाजवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास हवालदार निंबा शिंदे व त्यांच्या समवेत असलेले होमगार्ड भूषण शिंदे यांना सापडली. सदर पर्सबाबत बसस्थानकातील प्रवाशांना विचारपूस करीत असतांनाच समोरून एक मुस्लिम महिला आली. पोलीस हवालदार निंबा शिंदे यांना पर्स हरवली असल्याचे सांगितले. हवालदार शिंदे यांनी सदर महिलेस पर्सचा रंग व कोणत्या वस्तू होत्या याबाबत विचारणा केली. महिलेने अचूक माहिती सांगीतल्याची खात्री केल्यावर हवालदार शिंदे यांनी सदर महिलेस पर्स परत केली. आपली हरवलेली पर्स दागीणे व रोख रक्कमेसह परत मिळाल्याने नजमबी खान व त्यांच्या परिवाराने समाधान व्यक्त केले व पोलीस हवालदार निंबा शिंदे व होमगार्ड भूषण शिंदे यांचे आभार मानले. कर्तव्यावर असतांना कर्तव्यदक्षतेचे पालन केल्यामुळेच प्रवासी महिलेची हरवलेली पर्स सापडली त्यामुळे हवालदार निंबा शिंदे व होमगार्ड भूषण शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा घटनांमुळेच समाजाचा पोलीस विश्वास अधिक वृद्धींगत होईल अशी भावना समाज मनातून व्यक्त होत आहे.
No comments
Post a Comment