अमळनेर - माझी राजकीय वाटचाल भाजपापासून सुरू झाली आहे. स्व.उदय वाघ व मी भाजपमध्ये एकत्र काम करत होतो. विविध निवडणुकांत आम्ही सोबतच राहिलो मध्यंतरी काही कालखंडात दुरावा निर्माण झाला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी आम्ही पुन्हा जुने मित्र एकत्र आलो.आमचे तात्त्विक मतभेद होते. मात्र आमचे कौटुंबिक संबध कायम राहिले. माझा सच्चा, निष्णात आणि शब्दाला जागणारा मित्र गमावला. तालुक्याच्या राजकिय वादळात आम्ही एकत्र येत असतांना हा जिवाभावाचा मित्र मला सोडून गेला. यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पोकळी निर्माण झाली असून अपरिमित हानी झाली आहे.ती कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व या दुःखातून आमदार स्मिता वहिनी व त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना अशा भावपूर्ण शब्दात तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment