याबाबतची अधिक माहिती अशी की,सिंधी कॉलनीतील सुमित गोपालदास तोलाणी यांची यामाहा एफ झेड एस ब्लॅक कंपनीची निळ्या व काळ्या रंगाची एम एच -१९ ,सी एच ३१५७ या क्रमांकाची मोटारसायकल घरासमोरून चोरी झाली आहे. रात्री घरासमोर उभे केलेले वाहन सकाळी आढळून न आल्याने सुमित तोलाणी यांनी वाहनाचा शोध सुरू केला पण अद्याप पावेतो मोटारसायकल मिळालेली नाही. मागील काही दिवसात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वाहन मालकांनीही अशा घटना घडू नयेत याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तर पोलीस प्रशासनाने कसोशीने कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment