अमळनेर - थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने दि.३ जानेवारी रोजी अमळनेर येथे रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ,सावित्रीबाई महिला मंडळ,साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने दि.३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता येथील श्रीकृष्ण मंदीर चौक,माळी वाडा येथून मिरवणूकीस प्रारंभ होईल. अमळनेर शहर व तालुक्यातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने या रॅलीत व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ,सावित्रीबाई महिला मंडळ,साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कृतज्ञता-
प्रत्येक स्री-पुरूषाने जयंतीनिमित्त त्या दिवशी सावित्रीमाईंना अभिवादन करावे. घरात शक्य असेल तर गोड धोड करावे. सावित्रीमाईंची कार्यगाथा आपल्या मुलांना सांगा.दारापुढे रांगोळी काढा व छोटी छोटी माणूसभान देणारी पुस्तके भेट द्या.
No comments
Post a Comment