अमळनेर - ओबीसी शिक्षक असोसिएशनची सहविचार सभा धुळे येथे नुकतीच अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या सभेत जळगाव जिल्ह्यातील १२ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतांना शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे याउद्देशाने गुणगौरव पुरस्कार देण्यात येतो. गत १० वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या पुरस्कारासाठी २५ प्रस्ताव आले होते. त्यातून १२ प्रस्ताव निवडण्यात आले.यावेळी ईश्वर महाजन,प्रविण पाटील,वसुंधरा लांडगे,व्ही.आर.महाजन,सतिष वैष्णव,ज्ञानेश्वर खलाणे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सपत्निक स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
गुरुगौरव पुरस्कार
मनिषा चौधरी शिरसाळे. सतिश
कागणे पिंपळे बु.॥, जयश्री साळुंके अमळनेर, गुणवंतराव पाटील धाबे,
विजयानंद शिंदे माचले, मालोजी पवार भातखंडे, वैशाली पाटील भडगांव,सुशांत जगताप गुढे, उमेश इंगळे सावरखेडा, गोपाळ महाजन आसोदा, रमाकांत ठाकूर हातेड, प्राचार्य रविंद्र वळखेडे आमडदे

No comments
Post a Comment