अमळनेर- भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व.उदयबापू वाघ यांच्या स्मरणार्थ तालुक्यातील कळमसरे येथील शिवाजी राजपूत मित्र परिवार आणि ग्रामस्थांतर्फे आज दि. शनिवार २८ डिसेंबर रोजी किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता ह.भ.प.उमेश महाराज दहीवद खुर्दकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील भाविक आणि कार्यकर्त्यांनी किर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment