अमळनेर - महाराष्ट्र शासनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्याविषयी सुचित करण्यात आले आहे. दि.८ डिसेंबर रोजी संत श्री जगनाडे महाराज जयंती सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमीत्त अमळनेर तेली पंच मंडळाच्या वतीने शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना महाराजांची प्रतिमा व शासकीय परिपत्रकाची प्रत भेट देण्यात आली.
यावेळी शहरातील उपविभागीयअधिकारी,तहसीलदार,मुख्याधिकारी नगर परिषद,
भूमी अभिलेख कार्यालय,तालुका कृषी अधिकारी,गट विकास अधिकारी पं. स. अमळनेर,
दुय्यम निबंधक कार्यालय,
उपकोषागर अधिकारी या कार्यालयांना तेली पंच मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी,व पंच मंडळाचे सदस्य यांचे हस्ते प्रतिमा भेट देण्यात आली.
अमळनेर अर्बन बॅकेचे संचालक,आरोग्यदूत श्री प्रविण श्रीराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाईन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,सहसंपादक महेश पाटील,उपसंपादक रोहित बठेजा
No comments
Post a Comment