शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर हे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञाननगरीत जय्यत तयारी सुरू आहे.विज्ञान प्रदर्शनासाठी पाच गट तयार करण्यात आले आहेत. सहावी ते आठवी वर्गासाठी प्राथमिक गट, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक गट, पहिली ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती गट, नववी ते बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती गट तसेच प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर यांच्यासाठीही स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे.
शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मुख्य विषय असून, यात शाश्वत कृषी पद्धती, स्वच्छता आणि आरोग्य, संसाधन व्यवस्थापन, औद्योगिक विकास, भविष्यकालीन परिवहन व संचार, शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतिकृती या उपघटकांवर आधारीत विविध मॉडल्स तयार केले जाणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदविणे बंधनकारक आहे.
दि.६ डिसेंबर,शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल अध्यक्षस्थानी असतील. जि.प.चे शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पोपटराव भोळे यांच्या हस्ते विज्ञान साहित्य दालनाचे उद्घाटन होणार आहे. माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भिल, उपसभापती त्रिवेणीबाई पाटील यांच्यासह जि. प. सदस्या जयश्री पाटील, मिनाताई पाटील, सोनूताई पवार, संगीता भिल, पंचायत समितीच्या सदस्या रेखा पाटील, सदस्य भिकेश पाटील, कविता पाटील, विनोद पाटील, निवृत्ती पाटील, प्रवीण पाटील, न.पा.शिक्षण मंडळाचे सभापती नितीन निळे, ‘डायट’च्या प्राचार्या डॉ. मंजुषा क्षीरसागर, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, बजरंगलाल अग्रवाल, गटविकास अधिकारी संदीप वायाळ प्रमुख पाहुणे राहतील. तर दि.७ डिसेंबर,शनिवार रोजी दुपारी ३ वाजता माजी आमदार शिरीष चौधरी व प्रा. डी. डी. पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील अध्यक्षस्थानी राहतील. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, शापोआ अधीक्षक बी. पी. चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पी. डी. धनगर, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, विवेकानंद स्कुलचे प्रेसिडेंट नीरज अग्रवाल, प्राचार्य गणेश मितपल्लीवार आदींनी केले आहे
No comments
Post a Comment