बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासाची स्वखर्चाने केली व्यवस्था अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची माणुसकी

Tuesday, December 3, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
 अमळनेर पोलीस स्टेशनला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी येणारे पोलीस कर्मचारी वर्गाची येथे 
राहण्याची सोय नव्हती.तुटपुंजी सोय होती.पण तेथे आंघोळीसाठी व शौचालयाची सोय नव्हती. या गैरसोयींमुळे बाहेरून आलेल्या पोलिसांनी आपआपली सोय करण्याचा प्रयत्न चालविला होता. हि बाब पोलीस कर्मचारी व चांगला जनसंपर्क असलेल्या
शरद पाटील यांना समजताच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या कानावर हि बाब घातली असता त्यांनी त्वरीत पाहणी करून स्वखर्चाने पोलिसांच्या या तात्पुरत्या निवासस्थानी नवीन विज दुरुस्ती व पाण्याची
सोय करून दिली आहे.यामुळे बाहेरून बंदोबस्ताला येणाऱ्या पोलिसांची अनेक वर्षांपासून होणारी गैरसोय थांबली असून पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे
यांच्या माणुसकी बाबत पोलीस वर्तुळात चांगली चर्चा होत आहे.
    पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पदभार घेतल्यापासूनच  आपल्या शिस्तप्रिय व सर्वसमावेशक कार्यपद्धतीने प्रशासनासह नागरिकातही आदराचे स्थान प्राप्त केले आहे. शहरातील शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी संख्येने असलेल्या पोलीस दलाचा योग्य क्षमतेने वापर करीत आहेत. नागरिक व व्यापारी बांधवांतही श्री अंबादास मोरे व पोलीस दल करीत असलेल्या कामाबद्दल व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.*

 
अमळनेर अर्बन बॅकेचे संचालक,आरोग्यदूत श्री प्रविण श्रीराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाईन्सचे संपादक-गुरूनामल बठेजा,सहसंपादक महेश पाटील,उपसंपादक रोहित बठेजा


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines