अमळनेर - येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्वसाधारण सभेने सभासदांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना सभासदत्व देण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. खा.शि.मंडळाचे सभासद श्री. प्रसाद भाऊ शर्मा यांनी याबाबत मागणी केली होती. त्याचप्रमाणे "जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी" या घोषणेचा वापर करून मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व हा जाहीरनामा घेऊन त्यांनी निवडणूकीत लढवली होती. या त्रैवार्षिक निवडणूकीनंतर मागील वर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन हा विषय मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याची कार्यवाही करावी यासाठीचे अर्ज माजी नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा यांच्या वाड्यात मयत सभासदाच्या वारसांना देण्यात आले. प्रताप मिल कर्मचारी बोहरी साहेब, हाजी गफुर मकबुल व साळी कृष्णादास भावडू यांचे वारसांना अर्ज देण्यात आले.याप्रसंगी मुन्ना भाऊ शर्मा,प्रसाद शर्मा,चंद्रकांत यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तसेच खा.शि.मंडळाच्या सदर ठरावाची प्रत आपल्याला पहाण्यासाठी उपलब्ध आहे असे प्रसाद शर्मा यांनी कळविले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment