बंगाली फाईल भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

Tuesday, December 3, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
शहरातील बंगाली फाईल भागातील रहिवाश्यांना घरे स्वतःच्या नावावर नसल्याने व मालकही सापडत नसल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.हा लाभ मिळण्याकरिता नगर पालिका प्रशासनाने मदत करावी अशा मागणीचे निवेदन  या भागातील नागरिकांनी एकत्र येत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना आज दिले.
       या बाबत सविस्तर असे की,शहरातील बंगाली फाईल परिसर हा स्लम एरिया,आर्थिक दुर्बल घटक आणि दलित वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो.या भागात गेल्या ७०/८० वर्षांपासून या नागरिकांचे वास्तव्य आहे.तरी पण यांना  शासनाच्या घरकुल सारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.कारण ही घरे या भागाचे मूळ मालक सुधाकर विष्णू परांजपे व त्यांचे ५ वारस यांच्या नावे ३१/७/१९५३ ला झालेल्या सर्वे नुसार उताऱ्यावर आहे.शिवाय या व्यक्तीही सापडत नाही.काही रहिवाशांनी पुणे,मुंबई या ठिकाणीही या परिवाराचा व त्यांच्या वारसदारांचा तपास केला.पण कुणीही आढळून आले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.या सर्व समस्येतुन पालिका प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावा या आशयाचे आज निवेदन देण्यात आले.यावेळी राजेंद्र यादव,सुरेश सोनवणे,चंद्रकांत मोरे,मोहन वाडकर,राजेंद्र शिंदे,संतोष शिंदे,चंद्रशेखर सोनवणे,मनोज शिंदे,भावेश शेजवळ,नरेश शेजवळ,पवन गायकवाड,बापू फणसे,सागर पोळ,दिपक पोळ,बापू खैरनार,कैलास पाटील,योगेश लटपटे, प्रसाद चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

 
अमळनेर अर्बन बॅकेचे संचालक,आरोग्यदूत श्री प्रविण श्रीराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाईन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,सहसंपादक महेश पाटील,उपसंपादक रोहित बठेजा

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines