अमळनेर - भुसावळ येथील महाराजा यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्यावतीने दि.१२ जानेवारी २०२० रोजी धनगर वधू- वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात नियोजित वधू-वरांना व्यासपीठावर परिचयासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. नोंदणी फी ५००/-रुपये असून नोंदणी केल्यास वधू-वर परिचय पुस्तिका मोफत देण्यात येईल.अपंग वधू-वर नोंदणी मोफत करण्यात येईल. नाव नोंदणीची अंतिम मुदत दि.२५ डिसेंबर २०१९ पर्यंत आहे.
सदर मेळावा दि.१२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. कृष्णचंद्र सभागृह, केला सायडींग,क्रिकेट ग्राउंडसमोर भुसावळ येथे होत असलेल्या या मेळाव्यात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष सौ.सुजाता सोनवणे व सचिव चंद्रशेखर सोनवणे ,गणेश सोनवणे ,भारत सोनवणे यांनी केले आहे.
अमळनेर अर्बन बॅकेचे संचालक,आरोग्यदूत श्री प्रविण श्रीराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाईन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,सहसंपादक महेश पाटील,उपसंपादक रोहित बठेजा
No comments
Post a Comment