अमळनेर - शहरालगत चोपडा रोडवर अंबर्षी टेकडी आहे. सदरच्या टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड वृक्षप्रेमी करत आहेत. टेकडीवर शेकडो नागरीक रोज सकाळी व संध्याकाळी फिरावयास जात असतात.
सर्वात चांगली शुध्द हवा त्याठिकाणी नागरिकांना मिळत आहे.बहुतेक नागरीक मंगळग्रह मंदीर परीसरात आपापले वाहन लावून पायी अंबर्षी टेकडीवर जात असतात.परंतु आता नुकतेच मंगळग्रह मंदिर ते अंबर्षी टेकडी या परिसरात न.पा.च्या कचरा गाड्या कचरा टाकत आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींना शुध्द हवा मिळण्यापेक्षा अशुध्द हवा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अमळनेरचे उपविभागीय अधिकारी सुध्दा रोज अंबर्षी टेकडीवर येत असतात. पर्यावरण प्रेमी नागरीकांनी त्यांच्याकडे सुध्दा तोंडी तक्रार केलेली आहे.
तरी न.पा.ने नागरीकांच्या हिताच्या दृष्टीकोनातुन सदरच्या कचरा गाड्यांवरील कर्मचा-यांना त्या भागात कचरा न टाकण्याची सक्त सुचना द्यावी तसेच त्याठिकाणी टाकलेला सर्व कचरा ताबडतोबाने उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर संजय चौधरी,महेश कोठावदे,सुरेश भावसार,सुनील भोई,डॉ अनिल वाणी,पकंज चौधरी, विजय चौधरी,किरण पाटील,सुनील भामरे,योगराज संदानशिव,श्रीराम चौधरी, डॉ राजेंद्र सोनार, योगेश येवले,राहुल पाटील, मोतीलाल जैन, नरेश कांबळे,गोपाळ कुंभार, किशोर पाटील, विजय पाटील, अशोक वाणी,आबा फुलपगारे यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
No comments
Post a Comment