अमळनेर - तालुक्यात गौण खनिजाच्या होणाऱ्या कथित लयलुटीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाने अमळनेर तहसील कार्यालयावर एल्गार पुकारला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षा ज्योती भोई यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारानां निवेदन देण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात गौण खनिजाचे मोठे नैसर्गिक साठे असून अवैध गौण खनिजाची चोरट्यां मार्फत लयलूट होत आहे पण महसूल विभाग झोपेचे सोंग घेत आहे.
विनापरवानगी अवैध पध्दतीने गौण खनिजे चोरी करणारांवर संबंधितांनी ८ दिवसाच्या आत कठोर व दंडात्मक कार्यवाही करावी नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा लेखी इशारा आम्ही प्रशासनाला दिला आहे.
- प्रा ज्योती भोई
युवती जिल्हाध्यक्ष,रासप

अवैध गौण खनिज वाहतूकदारांविषयी रासपाच्या ज्योती भोई यांनी तक्रार अर्ज दिल्याने सदर प्रकरणाला किती आळा बसेल व झोपेचे सोंग घेतलेल्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारांवर काय कार्यवाही होते या कडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे.
याप्रसंगी अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. निवेदनावर योगेश पाटील, ज्योत्स्ना लोहार, संगीता मैलागीर, भारती पाटील, कल्पना मिस्त्री, प्रिया वाघ , सुशीलाबाई भोई, आशा बाविस्कर, सुनंदा पाटील, महेश चौधरी, उमेश पाटील व पंकज लांडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments
Post a Comment