हायवेवर अपघातात जखमी कुत्र्यास दिपक कुंभार यांनी दिले जीवदान
पारोळा - येथील किसान कॉलेज समोरील नॅशनल हायवे नंबर ६ वर एका कुत्र्यास अजात गाडीने धडक दिली असता तिचे मागचे पाय व कमरेला दुखापत झाली. ते रस्त्याच्या कडेला रात्रभर पडलेले असताना त्याच्याबरोबर असणारा कुत्रा हा संपूर्ण रात्रभर त्याचे जवळ बसला असल्याचे चित्र दिसून आले नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्राणिमित्र दिपक कुंभार,निरज खैरनार, कैलास चौधरी ,सुमित अहिरे, बबलू राजपूत ,प्रसाद व सचिन या मित्रांनी त्या दुखापत झालेल्या कुत्र्यास उचलून दवाखान्यात नेले.पशुवैद्यकीय रूग्णालयात डॉक्टरांनी उपचार केल्याने सदर कुत्र्यास जीवदान मिळाले आहे. दिपक कुंभार व त्याचे मित्रांनी केलेल्या या मदतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment