अमळनेर - शहरातील प्रभाग क्र.१५ व त्यालगत असलेल्या नविन कॉलनी परिसरात चोरीचे प्रमाण वाढलेले असून त्यास आळा घालण्यासाठी या भुरट्या चोरांचा ब॔दोबस्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रताप शिंपी,जीवन पवार यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रभाग क्र.१५ व प्रभागापासून अनेक नविन कॉलनी व गृहनिर्माण प्रकल्प झालेले असून सद्या ह्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या घराबाहेरील इलेक्ट्रिक मोटारी, लोखंडी वस्तू, व ईतर संसारोपयोगी वस्तूंची चोरी केली जात आहे ,त्यामुळे परीसरातील नागरिक भयभयीत झाले असून आम्हीही परिसरात सामूहिक गस्त घालीत आहोत तरी आपल्या नेतृत्वाखाली रात्री गस्तीवर असलेली पोलीस गाडी देखील गस्त घालावी जेणेकरून चोरांना दहशत होऊन नागरिक सुटकेचा सुस्कारा घेतील . तरी सदर परिसरातील गस्ती वाढवून चोरांचा तातडीने बंदोबस्त व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर नगरसेवक प्रताप अशोक शिंपी,
No comments
Post a Comment