भाजपा नेते स्व.उदय वाघ यांच्या अस्थिकलशाचे नागरिकांनी घेतले दर्शन शोकमग्न वातावरणात ग्रामस्थांनी अर्पण केली आदरांजली

Wednesday, December 4, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
जळगाव जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व.उदय वाघ यांच्या अस्थिकलश यात्रेस तालुक्यातील नागरिकांच्या दर्शनासाठी आज सकाळी त्यांचे मुळ गाव असलेल्या डांगर बु.॥ येथून प्रारंभ झाला. दोन अस्थिकलश असलेले दोन चित्ररथ वेगवेगळ्या मार्गांनी निघाले असून त्या-त्या गावातील भाजपा पदाधिकारी,इतर सामाजिक व राजकीय कार्यकर्ते,ग्रामस्थ  अस्थिकलशाचे दर्शन घेत आहेत. दि.५ डिसेंबर रोजी या यात्रेचा दुसरा दिवस आहे.
     आज (दि.४रोजी) सकाळी डांगर येथे दोन्ही रथांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यात्रा क्र.१ - रणाईचे,अंचलवाडी,जवखेडे, वावडे,मांडळ,मुडी,बोदर्डे,कळंबु, बाम्हणे,भिलाली,एकलहरे,भरवस, लोण, झाडी,गळवाडे,ढेकूसीम, शिरसाळे,तळवाडे,आर्डी,आनोरे, पिंपळे बु.॥ व खु.॥,आटाळे, मंगरूळ,वाघोदा,निसर्डी,खडके, लोंढवे मुक्कामी अमळनेर तर यात्रा क्र. २ ने जानवे,इंद्रापिंप्री, कावपिंप्री,शिरूड,सुमठाणे, वडगाव,जिराळी,इंधवे, पिंपळकोठा,वसंतनगर,भोलाणे, बहादरपूर,फापोरे,कन्हेरे,सडावण,रत्नापिंप्री,शेळावे,चिखलोड, राजवड,ढेकू,सारबेटे,हेडावे मुक्कामी अमळनेर असा अस्थिकलश यात्रेचा आजचा मार्ग होता. प्रत्येक गावात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री-पुरूष नागरिक दर्शन घेऊन आपल्या आठवणींना उजाळा देत होते. आपल्या सुख-दु: खाच्या प्रसंगी आपुलकीने सहभागी होणारा नेता अचानक आपल्यातून निघून गेला अशा भावना नागरिक व्यक्त करीत आदरांजली अर्पण करीत होते. यात्रेसमवेत स्थानिक भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 
 यात्रेचा दि.५ रोजीचा मार्ग
     दि.५ डिसेंबर गुरूवार रोजी दोन्ही यात्रा सकाळी अमळनेर येथून ग्रामीण भागात रवाना होतील. त्यांचा मार्ग खालीलप्रमाणे-
  यात्रा क्र. १ -  धार,मालपूर, मारवड,गोवर्धन,कळमसरे,नीम, तांदळी,शहापूर,एकतास,पाडसे, चौबारी,जैतपीर,अंतुर्ली,रंजाणे, नंदगाव,लडगाव,आमोदे, तासखेडे,हिंगोणे,दरेगाव,मुडी, पिंगळवाडे,मेहरगाव,निंभोरा, कलाली,दोधवद,हिंगोणे मुक्कामी अमळनेर.
  यात्रा क्र. २ - कुर्हे,टाकरखेडे, दहिवद खु.॥,दहिवद,पातोंडा, सावखेडे,मुंगसे,रूंधाटी, मठगव्हाण,गडखांब, नगाव खु.॥- बु.॥, देवळी, खौशी, खेडी, पिंपळी, पिळोदा,गांधली मुक्कामी अमळनेर असा अस्थिकलश यात्रेचा आजचा मार्ग असणार आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines