अमळनेर पोलीसांनी घरफोडीचा २४ तासात लावला छडा मुद्देमालासह तीन आरोपींना घेतले ताब्यात

Friday, December 27, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर-
शहरात काल झालेल्या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपींना २४ तासात  मुद्देमालासह ताब्यात घेण्यात पोलीस दलास यश आले आहे. 
    शहरात झालेल्या घरफोडी- प्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सचिन गोर, चाळीसगांव यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस आधिकारी श्री राजेंद्र  ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचे मार्गदर्शना  नुसार गुन्ह्यातील आरोपीचा शोध पोलीस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी, पोना शरद पाटील, पोना दीपक माळी, पोकॉ रवी पाटील यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा २४ तासांच्या आत तांत्रिक मदतीच्या सहाय्याने छडा लावला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा शोध घेऊन आरोपीस धुळे येथून पकडून आणून त्याचे इतर दोन साथीदार यांना अमळनेर येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी निशांत शेख करीम शेख,मोसिम खान कारीफ खान व जयेश रविंद्र बोरसे या तीन आरोपींना अटक केली आहे.आरोपींकडून गुन्ह्यातील कॅश, मोबाईल व दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत.अमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ नुसार     ५३६/२०१९ कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines